Breaking News

महिला क्रिकेट स्पर्धेत जगदंब संघाची बाजी

महाड : प्रतिनिधी
येथील भिलारे मैदानावर सुनील विलास कोरपे पुरस्कृत महिला क्रिकेट स्पर्धेत महाडमधील शिक्षिकांच्या जगदंब संघाने अंतिम फेरीत युनिक संघाला पराभूत करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेत आठ महिला संघ सहभागी झाले होते.
अंडरआर्म स्पर्धेला महिलांडून प्रतिसाद मिळाला. महाडसह पुणे येथून आठ संघांनी सहभाग घेतला. पुण्यातील दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या महिलांचा खेळ पाहून महाडकर थक्क झाले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. प्रीती देशमुखला मालिकावीर, प्रियांका सर्कलेला उत्कृष्ट फलंदाज, उषा खोपडेला उत्कृष्ट गोलंदाज, दिव्यांग अश्विनी होनमानेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.
सुनील कोरपेंनी एप्रिलमध्ये चांदे क्रीडांगणावर महिलांच्या रजनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे जाहीर केले. पत्रकार महेश शिंदे यांनी आज खर्‍या अर्थाने तुम्ही सावित्रीच्या लेकी शोभता, असे सांगितले. व्यासपीठावर राजू मुजावर, पत्रकार रवींद्र शिंदे उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply