Breaking News

अजिंक्य राहणेवर अन्याय : वेंगसरकर

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे 2018 साली सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वन-डे सामना खेळला होता. यानंतर अजिंक्यला एकाही वन-डे सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणेवर अन्याय करत असल्याचे मत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.

अजिंक्य रहाणेकडे दुर्लक्ष करून भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर अन्याय करतेय. इंग्लंडमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केले. याचसोबत तो एक चांगला क्षेत्ररक्षकही आहे. अजिंक्य भारतीय संघात सलामीला आणि चौथ्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो. मधल्या फळीत त्याचा अनुभव भारतीय संघासाठी कामाला येऊ शकतो. अंबाती रायुडू गेल्या काही सामन्यांत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसल्यामुळे भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला

कोण येणार हा प्रश्न अजूनही कायम आहे.

अजिंक्य गरजेच्या वेळी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करीत भारतीय संघाचा डावही तितकाच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. हा ट्वेन्टी-20 विश्वचषक नाहीये. इकडे गरजेच्या वेळी तुमच्या संघाचा डाव सावरणेही तितकेच महत्त्वाचे असते. प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला किमान 280 धावांपर्यंतची धावसंख्या उभारावी लागणार आहे, असे वेंगसरकर म्हणाले. त्यामुळे आगामी विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात जागा मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply