Breaking News

घराच्या वादातून चाकूचे वार; तरुण गंभीर जखमी

पनवेल : बातमीदार 

विक्रोळी येथील घराच्या वादाच्या भांडणाचा राग मनात धरून 27 वर्षीय तरुणाला शिवीगाळी करून त्याच्या छातीवर तसेच पाठीवर चाकूने वार केल्याची घटना खारघर येथे घडली. खारघर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद अयाझ अब्दुल सैय्यद हे खारघर येथे राहत असून ते ड्रायव्हरचे काम करतात. विक्रोळी ईस्ट मुंबई येथे पहिल्या माळ्यावरील घर हे त्यांच्या आईच्या नावावर असून या घरावर नसिब खाजा मयुद्दीन सैय्यद याने तीन महिन्यांपासून कब्जा केला आहे. याबाबत सय्यद यांनी नासीर याच्याविरुध्द विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सय्यद व अमान हे आपले काम संपवून रेल्वेने खारघर रेल्वे स्टेशन येथे रिक्षाने सेक्टर 34 येथे पोहचले. या वेळी अमनला त्यांनी घरी सोडले व स्वतः घराकडे पायी चालत येत असताना खारघर सेक्टर 34 येथे मागून एक इको कार आली.  इको कारमध्ये नासरे, नविदा, अरफाद उर्फ मुस्तफा, फहाद व दोन बुरखा  घातलेल्या दोन महिला होत्या. ते सर्व इको कारमधून खाली उतरून अम्मीला बोलावून घे नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील, असे सय्यद यांना सांगितले. या वेळी नविदा यांनी सय्यद यांना शिवीगाळ केली व नासरे याने सय्यद याच्या एक चापट मारली. त्यानंतर फहाद याने सय्यद याच्या डोक्यात पाठीमागून काहीतरी मारले, तर अरफान उर्फ मुस्तका याने पाठीमागून चाकूने त्यांच्या दोन ठिकाणी वार केले व नासेर याने चाकूने छातीवर चार ठिकाणी वार केले. या प्रकाराने परिसरात खळबळ माजली आहे.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply