Breaking News

अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या दोघांना पोलिसांकडून अटक

पनवेल : बातमीदार 

पनवेल-मुंब्रा रस्त्यावर कळंबोली येथे पांढर्‍या रंगाच्या मारुती इर्टिगा गाडीमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना कळंबोली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 13 हजारांचे मद्य व वाहन जप्त करण्यात आले आहे. तुषार शालिक कडू (32, खारघर), शक्तीकुमार हरिनाथ मिश्रा (37, रोडपाली) अशी या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड व त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना फायर ब्रिगेड सिग्नलजवळील पनवेल-मुंब्रा रोडवर कळंबोली येथे दोन इसम पांढर्‍या रंगाच्या इर्टिगा कारमध्ये बसून पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी (एमएच 46 बीए 8658) या वाहनाचा पाठलाग केला व त्यांची गाडी थांबवली. गाडीची पाहणी करून या दोघांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये देशी व विदेशी मद्य आढळले.

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply