उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिर्ले गावचे भूमिपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ पांडुरंग घरत यांचे शुक्रवारी (दि.2) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. अजातशत्रू असलेल्या निळकंठ घरत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
मनमिळावू स्वभाव व दुसर्यांना आनंद देणारे निळकंठ घरत यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाबद्दल भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदींनी शोक व्यक्त केला आहे. घरत यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चिर्ले येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व घरत परिवार आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …