पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिन आणि पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल चेस असोसिएशनच्या माध्यमातून महिलांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा 8 मार्च रोजी अध्यापक महाविद्यालयात होणार आहे.
स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने खेळली जाईल. प्रत्येक गटात 10 पारितोषिके, तर सर्व सहभागी खेळाडूंना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी 15 वर्षांवरील महिला आणि 15 वर्षांखालील मुली (1 जानेवारी 2005नंतर जन्मलेल्या) असे दोन गट असून, त्यासाठी प्रवेश फी अनुक्रमे 100 रुपये व 200 रु. अशी आहे.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी 10 वा. महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. शुभदा नील, अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रमा भोसले, पाले बुद्रुक येथील पुष्पनिकेतन इंग्लिश स्कूलच्या सचिव मीना बन्सल उपस्थित
राहणार आहेत. स्पर्धेसाठी सोसायटी फॉर सोशल इनोेवेन्शन डेव्हलपमेंट पुणे व चतुरंग निर्माण प्रतिष्ठान, पनवेल यांचे सहकार्य लाभत आहे. अधिक माहितीसाठी मंगला बिराजदार (9920156144), डॉ. नीलिमा मोरे (9869410268), सी. एन. पाटील (9326504179), डॉ. सोनल शेठ (9702040482), अमित कदम (9619190781) यांच्याशी संपर्क साधावा.