नवी दिल्ली : वृत्तसंस्था
चीननंतर अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गामुळे जगभरातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्यानंतर आता इंडियन प्रीमियर क्रिकेट लीगला (आयपीएल) त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ‘कोरोना’मुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या 13व्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे, परंतु ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अनेक मोठे कार्यक्रम रद्द होत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार आहे, असे टोपे यांनी सांगितले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …