Breaking News

ऑलिम्पियाड हिंदी परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे यश

खारघर : रामप्रहर वृत्त

सिल्वर झोन फाऊंडेशन दिल्ली आयोजित अखिल भारतीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा 17 डिसेंबर 2019 रोजी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघर येथे घेण्यात आल्या होत्या. या परीक्षा इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध गटात आयोजित केल्या होत्या. या परीक्षेत खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन, सात गोल्ड मेडल, सहा सिल्वर मेडल, तीन ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. तसेच रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी सारा सक्सेना हिला अखिल भारतीय हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत रिजनल लेव्हलवर झोनल रँकमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. वरील सर्व विद्यार्थ्यांचे, संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply