Breaking News

दीपाली खरात कामोठे सौंदर्य सम्राज्ञी; सामाजिक क्षेत्रांत काम करणार्या तीन हिरकणींचा गौरव

पनवेल ः प्रतिनिधी

कामोठे येथील दिशा महिला मंचकडून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. 7) महिला दिनानिमित्त कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ‘ती’ हिरकणी पुरस्कार 2020 देऊन सामाजिक क्षेत्रांत काम करणार्‍या तीन हिरकणींचा गौरव करण्यात आला.

या वेळी डॉ. रजत जाधव, सूरदास गोवारी, इंदू झा, जयसुधा हेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिशा महिला व्यासपीठाच्या अध्यक्षा नीलम आंधळे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन ’ती’ हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार्‍या गौरवमूर्तींची ओळख करून दिली. सामाजिक क्षेत्रात अव्याहतपणे काम करणार्‍या मीराताई लाड, आश्रय फाऊंडेशनच्या मनीषा अहिवळे-पवार आणि रिनी लॉरेन्स या तीन महिलांना ’ती’ हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेतून विश्वकर्ता हा जग रंगविणारा एक कुशल रंगारी असेल, तर स्त्री ही त्याने रंगविलेली

सर्वोत्कृष्ट रंगकृती म्हटली पाहिजे, या उक्तीप्रमाणे आणि विविध प्रकारच्या साड्या परिधान करून विविधतेत एकता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कामोठे सौंदर्य सम्राज्ञी स्पर्धेमध्ये एकूण 27 महिलांनी सहभाग घेतला. मिसेस इंडिया युनिव्हर्स 2019 श्रीजीता बॅनर्जी, मिसेस इंडस इंडिया इंटरनॅशनल विजेती डॉ. शीतल गोसावी आणि मेडीक्वीन मिसेस क्रिएटिव्ह इन मेडीक्वीन डॉ. श्रुणाल जाधव यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.  प्रथम सौंदर्य सम्राज्ञी दीपाली खरात, द्वितीय सौंदर्य सम्राज्ञी रूपाली होगडे आणि तृतीय सौंदर्य सम्राज्ञी गीता कुडाळकर सौंदर्य स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. स्पर्धेत 10 महिलांना विविध नामांकनांनी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. नितीन थोरात, महेश चव्हाण, शैलेश ठाकूर, रोशनी ओरपे यांचे विशेष सहकार्य लाभले. दिशा मंचच्या रेखा ठाकूर, उषा डुकरे, ख़ुशी सावर्डेकर व विद्या मोहिते यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन सुमेधा लिमन यांनी केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply