Breaking News

आमदार महेश बालदी मित्र मंडळाचे धूलिवंदन

उरण : वार्ताहर

उरण शहरासह ग्रामीण भागात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला. उरण शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या भागात, सोसायट्यांमध्ये होळी सण साजरा करण्यात आला. होळी सण साजरा केल्यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 10) धुळवड सण साजरा करण्यात आला.

विविध रंगांनी लहान बच्चे कंपनीपासून युवती-युवक ते सर्व वयोगटातील नागरिक धुळवड साजरी करताना सर्वत्र दिसत होते.

उरण शहरातील आमदार महेश बालदी मित्र मंडळ यांनी उरण शहरातील समेळ बंधू स्नॅक कॉर्नर जवळ स्वामी विवेकानंद चौक येथे धुळवड आमदार महेश बालदी यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरी केली. उरण मोराकडे जाणार्‍या व मोरा ते उरण शहरात येणार्‍या नागरिकांना रंगानी रंगवुन आपला धुळवड सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

या उत्साहात आमदार महेश बालदी, उरण नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक राजेश ठाकूर, रवी भोईर, कौशिक शाह, तसेच उदयोजक सुनील पेडणेकर, उदयोजक चंद्रहास घरत, मनन पटेल, परेश वैवडे, मनोहर सहतीया, हितेश शाह, संतोष ओटावकर, अमित शेलार, पंकज समेळ, शैलेश समेळ, मकरंद पोतदार, सविन म्हात्रे, दिनेश ठक्कर, मदन कोळी, निलेश पाटील, राजेश कोळी, पुरुषोत्तम सेवक, पी. टी. चव्हाण, माँ. वैष्णवदेवी मित्र मंडळ अध्यक्ष बाबुराम वर्मा, सुंदर यादव आदी सहभागी झाले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply