Breaking News

नागोठणे ग्रामपंचायतीने दुकानाला ठोकले टाळे

नागोठणे : प्रतिनिधी – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊनला 16 जुलैपासून प्रारंभ झाला आहे. येथील गांधी चौकात एक नवीन दुकान उद्घाटनापूर्वीच लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी काही कामानिमित्त उघडण्यात आले. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी उपसरपंच सुरेश जैन तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि पोलिसांसह या ठिकाणी

जाऊन दुकानात असणार्‍या सर्वांना बाहेर काढत दुकानाला कुलूप लावले.

याबाबत सरपंच डॉ. धात्रक यांना विचारले असता, ही कारवाई 48 तासांची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुकान उघडे ठेवल्याबद्दल त्यांच्यावरसुद्धा दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply