Breaking News

पेणमधील वाशीनाका येथे बिबट्याची कातडी जप्त

वनविभागाची कारवाई; आरोपी फरार

पेण : प्रतिनिधी
अलिबाग वनविभाग पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुंबई गोवा महामार्गावरील उंबर्डे फाट्याच्या दक्षिणेकडे वाशी नाका, पेण येथे असलेल्या म्हात्रेचाळीत वन्य प्राण्यांच्या कातडीची विक्री होणार होती. त्यानुसार वेगवेगळे पथक तयार करून रविवारी (दि. 12) सायंकाळी 5 वाजता सापळा रचून आरोपीचा पाठलाग करीत बिबट्याचे सुकलेले कातडे व एक मोटार सायकल जप्त केली. संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दुचाकी आणि मौल्यवान बिबट्याचे कातडे वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गायत्री पाटील आणि नवी मुंबई येथील डब्लूसीसीबी डब्लूआर पथकाचे उपसंचालक योगेश वरकड, अलिबाग उपवनसंरक्षक राहुल पाटील अलिबाग वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गायत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली असून फरार आरोपीचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.
या कारवाईत पेण वनविभागाचे वनपाल वनरक्षक तसेच अलिबाग येथील फिरते पथक यांचे सहकार्य लाभले. वेगवेगळ्या पथकाने सापळा रचून प्रतिबंध केला होता मात्र सुगावा लागताच आरोपीने पलायन केले.

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तीन ते सात वर्षांची सक्षम कारावासाची शिक्षा होते. नागरिकांनी अंधश्रद्धा व आमिषांना बळी न पडता प्राण्यांच्या कातड्याची तस्करी करणार्‍यांची माहिती वनविभागाला द्यावी संबंधीत व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. वन्यप्राण्यांची तस्करीसह कातडी विक्री करणारे आरोपींचा शोध वनविभागाकडून सुरू केला आहे.
-गायत्री पाटील, सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी, अलिबाग

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply