पनवेल : रामप्रहर वृत्त
दीपक फर्टिलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स
कॉर्पोरेशन लिमिटेडचा (डीएफपीसीएल), सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने, तळोजा येथे पोलीस कर्मचार्यांसाठी ‘हेल्मेट वितरण शिबिरा’चे आयोजन तळोजा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डीएफपीसीएलमधील वरिष्ठ अधिकार्यांसह तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात 50 हेल्मेटचे वितरण करण्यात आले.
या वेळी बोलताना डीएफपीसीएलच्या संचालक तसेच ईशान्य फाऊंडेशनच्या विश्वस्त पारुल एस. मेहता म्हणाल्या कि, तळोजा पोलीस विभागातील पोलिसांसाठी रस्ते सुरक्षा उपक्रमाचा एक भाग म्हणून योगदान दिल्याबद्दल डीएफपीसीएल आणि ईशान्य फाऊंडेशनमधील प्रत्येक व्यक्तीला अभिमान वाटतो आहे. येथील पोलीस अधिकारी जाण्या-येण्यासाठी प्रामुख्याने मोटरसायकलचा वापर करतात. म्हणूनच त्यांचा प्रवास सुरक्षित करण्याच्या दिशेने,‘हेल्मेट वितरण शिबिर’ हा एक अल्पसा प्रयत्न आहे.