Breaking News

रसायनी विभागात शेकापला धक्का!

सरपंच राजेश्री पाटील यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील देवळोली ग्रामपंचायतीच्या सरपंच राजेश्री पाटील तसेच राजेश पाटील यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह शुक्रवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. उरण विधासनसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी आणि पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते पाटील यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे रसायनी विभागात शेकापला मोठा झटका बसला आहे.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका प्रिती जॉर्ज, माजी पंचायत समिती सदस्य जगदिश पवार, जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, हभप अनंतबुवा पाटील, संदीप पाटील, रोहिदास पाटील, योगेश पाटील, उमेश पाटील, आदित्य गाताडे आदी उपस्थित होते.
सरपंच राजेश्री पाटील, राजेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशामुळे वावेघर जिल्हा परिषदेच्या उमेदवार अनन्या गाताडे आणि पोयंजे पंचायत समितीच्या उमेदवार अस्मिता पाटील यांना संघटनात्मक फायदा होणार आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply