Breaking News

महानगर गॅस पाइपलाइनचे काम थांबवावे

रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांचे आदेश

कर्जत : प्रतिनिधी

रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकण्यात येणार्‍या  महानगर गॅस पाइपलाइनचे काम ताबडतोब थांबवावे, असे आदेश रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांनी मंगळवारी (दि. 2) दिल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्र 548 अ मुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब मोबदला मिळावा. तसेच कर्जत भिसेगाव येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीस रस्त्यामुळे जो धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी सुरक्षा भिंत बांधावी आणि महानगर गॅस पाइपलाइन रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकू नये असे आदेश असतानासुद्धा पाइपलाइन जबरदस्तीने ठेकेदार टाकत आहेत ते काम ताबडतोब थांबवावे, अशा मागण्या कर्जतमधील बाधित शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि. 2) रस्ते विकास महामंडळाच्या सचिवांची भेट घेऊन केल्या.

भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांनी बाधित शेतकरी ताटीपल्ली मोहनराज, सौरभ गुप्ता, प्रकाश हजारे, अमोघ कुलकर्णी यांच्या समवेत रस्ते विकास महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांची मंगळवारी (दि. 2) वांद्रे येथे भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्र 548 अ मुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब मोबदला मिळावा तसेच तेथील आदिवासी बांधवांच्या वस्तीस रस्त्यामुळे जो धोका निर्माण झाला आहे, तो दूर करण्यासाठी सुरक्षा भिंत बांधावी आणि महानगर गॅस पाइपलाइन रस्त्याच्या साईडपट्टीमधून टाकू नये असे आदेश असतानासुद्धा ठेकेदार जबरदस्तीने पाइपलाइन टाकत आहेत ते काम ताबडतोब थांबवावे, अशा मागण्या केल्या.

महामंडळाचे मुख्य सचिव राधेश्याम मोपलवर यांनी  महानगर गॅस पाइपलाइनचे काम ताबडतोब थांबवावे, आशा सूचना अभियंता सीमा पाटील यांना दिल्या. तसेच महामार्गाच्या विविध तक्रारी आणि समस्यांबाबत लवकरच बैठक आयोजित करु, असे आश्वासन दिले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply