Breaking News

आदई येथे फॅशन शो रंगला

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

आदई येथील अष्टविनायक गृह संकुलामध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोसायटीतील महिलांनी केले. सोसायटीतील महिलांनी वक्तृत्व, अभिनय, नृत्य, गीत गायन आदी कलाविष्कार सादर करून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. त्या विजेत्यांना मान्यवरांच्या

हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महिलांनी सादर केलेला फॅशन शो हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. यामध्ये वाईट विरुद्ध चांगले, अन्यायाविरुद्ध न्याय, दुर्गुणाविरुद्ध सुगुण, पापा विरुद्ध पुण्य यांचा कसा विजय होतो याचे सुंदर सादरीकरण केले गेले. या सर्व कलाकार महिलांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. फॅशन शोचे नियोजन व नृत्य दिग्दर्शन राधा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीतील महिलांनी परिश्रम घेतले. सुहा व नाजनीन पालेकर यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply