
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील आदर्श महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. 13)व्याख्यान तसेच मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होेते. हे कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमध्ये आदर्श महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अॅड. दीपाली बांद्रे यांचे बालन्यायालय व महिलांविषयी कायदे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. उमेश सर व दिलीका मॅडम यांनी मेडिटेशन विषयाची माहिती दिली. कार्यक्रमानिमित्त मंडळातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया म्हात्रे यांनी केले. या वेळी मंडळाच्या सर्व कमिटी सभासद उपस्थित होत्या.