Breaking News

विश्वनाथन आनंद अडकला जर्मनीत; कोरोना व्हायरसचा फटका

चेन्नई : वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित केल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिससह जवळपास सर्वच स्पर्धा रद्द केल्या असून यात आता बुद्धिबळाचादेखील समावेश झाला आहे.

भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद सध्या जर्मनीमध्ये एससी बॅडेन स्पर्धा खेळत आहे. पाच वेळा विश्वविजेता आनंदला सोमवारी (दि. 16) जर्मनीतून घरी परत यायचे होते, पण कोरोना व्हायरसमुळे त्याला जर्मनीतच थांबावे लागले आहे.

आनंद फेब्रुवारीपासून जर्मनीत आहे. एक आठवड्यापासून आनंदला इतरांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात बोलताना आनंद म्हणाला की, माझ्यासाठी हा एक विचित्र अनुभव आहे. माझ्या आयुष्यात असे प्रथमच घडत आहे की मला अन्य लोकांपासून वेगळ ठेवले गेले आहे.

कोरोना व्हायरसमुळे आनंदला या महिन्याच्या अखेरपर्यंत चेन्नईत येता येणार नाही. याबाबत आनंदची पत्नी अरुणाही काळजीत आहे. आनंद जर्मनीत आहे, पण तेथे अडकलेल्या अन्य लोकांपेक्षा आनंदची परिस्थिती अधिक चांगली आहे, हा मोठा दिलासा असल्याचे अरुणा यांनी सांगितले. आम्ही सर्व जण आनंदला खूप मिस करतोय. त्याला चांगले जेवण आणि वारंवार हात धुवण्यास सांगतोय. या महिन्याच्या अखेरपर्यंत तो भारतात येईल अशी आशा आहे, असे अरुणा म्हणाल्या.

कोरोना व्हायरसमुळे मी सध्या जगभरातील मित्रांसोबत चॅट करतो. इंटरनेटमुळे आम्ही बोलू शकतो. याशिवाय दिवसभरात मी दोन वेळा फिरायला जातो. कोणी भेटले तर काही अंतर लांब राहूनच बोलतो. त्याचबरोबर मुलगा अखिलला फ्रेंच परीक्षेसाठी मदत करतो – विश्वनाथन आनंद, ग्रँडमास्टर

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply