Breaking News

खालापूर तालुक्याला वादळी वार्याचा तडाखा

आदिवासी पाड्यावर घरांचे नुकसान

खालापूर : प्रतिनिधी

परतीच्या पावसाने सोमवारी (दि. 7) संध्याकाळी खालापूर तालुक्यात धुमाकूळ घातला. या वेळी वादळी वार्‍याने अनेक घरांचे नुकसान केले, तर काही ठिकाणी उभी पिके जमीनदोस्त केली. सोमवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने खालापूर तालुक्यामधील भिलवले आदिवासी वाडीतील अनेक झोपड्या जमीनदोस्त केल्या, तर काही झोपड्यांचे छप्परही उडवून नेल्याने आदिवासींचे संसार उघड्यावर आले आहेत. तूपगाव परिसरातील उभे भातपीक जमीनदोस्त झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी घटनास्थळी जाऊन आदिवासींना धीर दिला.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply