Breaking News

फ्रेंड्स ग्रुप साई क्रिकेट संघाला अंतिम विजेतेपद

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई संघाने अंतिम सामन्यात स्पार्टन माणगाव संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नवयुवक मित्रमंडळ खांदाड   माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली.

माणगावातील लोणशी मोहल्ला येथील मैदानावर रविवारी (दि. 15) ही स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेतील उपविजेत्या स्पार्टन माणगाव संघाला सात हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते यंगस्टार उतेखोल माणगाव  संघास पाच हजार रुपये व आकर्षक चषक व चतुर्थ क्रमांकाचे विजेते एव्हरग्रीन लोणशी मोहल्ला संघास तीन हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून यंगस्टार उतेखोल माणगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू सागर जोरकर, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सिद्धेश मापारले व मालिकावीराचा बहुमान फ्रेंड्स ग्रुप साई संघाचा अष्टपैलू खेळाडू वलिद बंदरकर यांनी पटकावला. सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply