कामोठे : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा विजयी करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत. मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे काँग्रेस आणि शेकाप पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावेळी व्यक्त केला.
भाजपच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये अनेक विकासाची कामे मार्गी लागली असून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत आहेत. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या विकासकामांवर प्रभावित होऊन विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. याच अनुषंगाने कामोठ्यातील काँग्रेसच्या नेत्या माया अहिरे तसेच शेकापचे योगेश देसाई, अमोल जाधव यांंच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत केले.
आपली महायुती ही खर्या अर्थाने महा आहे. आपण जात, पात, धर्म न मानता सर्वांना सोबत घेऊन काम करतो, असे या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार हॅप्पी सिंग, प्रदीप भगत, नीलम मोहिते, भाजपचे हर्षवर्धन पाटील, मयूर मोहिते, हरजिंदर कौर सिंग, ज्योती रायबोले, फातिमा आलम, सचिन गायकवाड यांच्यासह इतर पदधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper