असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
नवी मुंबई : बातमीदार
तुर्भे स्टोअर विभागामध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद जबरदस्त वाढली असून शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील मनमानी विरोधात आपल्या पदाचा राजीनामा देणारे नगरसेवक राजेश शिंदे यांनी रविवारी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य समर्थकांसह प्रवेश केला. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखाप्रमुख यांनीही शिवसेनेला रामराम ठोकला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी या पक्षातील अनेक पदाधिकार्यांनी तसेच रिक्षा संघटनांचे नेते आणि अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनी आपल्या अनेक सदस्यांसह भाजपत पक्ष प्रवेश केला आहे. आमदार गणेश नाईक यांनी या सर्वांचे भाजपत स्वागत केले. या वेळी माजी आमदार संदीप नाईक, परिवहन समितीचे माजी सभापती अन्वर शेख, अमृत मेढकर, अमित मेढ़कर आदी उपस्थित होते. आमदार नाईक यांनी नवी मुंबईचा विकास साधला असून या शहराचे नाव जागतिक पातळीवर नावाजले आहे असे सांगून तुर्भे स्टोअर मधील अकार्यक्षम नगरसेवकांना धडा शिकवून जनता बदल घडवून आणेल असा विश्वास माजी नगरसेवक शिंदे यांनी व्यक्त केला. सर्व समाज आमच्या पाठीशी आहे असेही त्यांनी नमूद केले. तुर्भे स्टोर वसविणार्यांमध्ये महत्त्वाचे काम करणारे राजेश शिंदे यांचे वडील शिवाजीराव शिंदे यांचे आणि लोकनेते नाईक यांचे जुने ऋणानुबंध आहेत. त्याचा दाखला देत आमदार नाईक यांनी राजेश शिंदे यांचे नेतृत्व सर्व समाजाला आणि सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणारे आहे, असे सांगून त्यांच्या माध्यमातून भविष्यात तुर्भे स्टोरचा विकास व्हावा यासाठी त्यांना ताकद देणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे नगरसेवक राजेश शिंदे यांच्यासह समाजसेवक राजू पाखरे, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख संजय गुप्ता, शाखाप्रमुख संजय गोपाळे, किशोर राठोड, सचिन वाघमारे, राजेश जवरे, राष्ट्रवादीचे प्रभाग 70 चे बाळू चंदनशिवे बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून या प्रभागात निवडणूक लढवलेले किशोर लोंढे, राष्ट्रवादीचे तालुका सचिव गिरीश माने, भिम ज्योत मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष नितीन शिंदे, तुर्भे स्टोअर रिक्षा स्टँडचे प्रमुख शंकर शिवशरण भिमज्योत मित्र मंडळाचे सचिव सिद्धार्थ फडतरे, शिंदे प्रतिष्ठानचे बुद्धभूषण गायकवाड, भिमज्योत मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण शिंदे, बाळू निलगुंडे तुर्भे स्टोअर रिक्षा स्टँड प्रमुख मनीष शिंदे, न्यू शावा मित्र मंडळाचे अध्यक्ष महेश शिंदे, अशोक राठोड, बंजारा समाजाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बाबू चव्हाण, उत्तर भारतीय समाज संघाचे महेश हलवाई, विजय कांबळे, उत्तम शिंदे, शिवसेना उत्तर भारतीय सेलचे जिल्हा उपसंघटक हजारी लाल गुप्ता, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक नासिर, समाजसेवक प्रदीप जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.