Breaking News

कोरोनामुळे फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या 21 व्या वर्षी प्राण गमवावे लागले आहेत. मलागा येथील अ‍ॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत 2016पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.

कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार केले आहे. फक्त सामान्य नागरिक नव्हे, तर अनेक देशांतील राजकीय नेते आणि खेळाडूंनादेखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीननंतर सध्या युरोपमध्ये करोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे. या व्हायरसमुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या सात हजारांच्या पुढे गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रासिस्को कॅन्सरवरदेखील उपचार करीत होते. यात काळात त्याला कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे मृत पावलेला गार्सिया हा सर्वांत युवा आहे. अन्य लोकं 70 ते 80 वर्षांचे होते.

अनेक स्पर्धांवर गंडांतर

जगभरातील 141 देशांत कोरोनाची रुग्ण आढळले आहेत. यामुळे अनेक मोठ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तर काही सामने मोकळ्या मैदानात प्रेक्षकांशिवाय घेतल्या जात आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका बीसीसीआयने रद्द केली. आता ही मालिका नंतर खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबतच स्थानिक सामने रद्द केले आहेत, तर आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. कोरोना व्हायरसमुळे हॉकीतील प्रतिष्ठित सुलतान अजलान शाह कप स्पर्धा स्थगित केली गेली आहे. ही स्पर्धा मलेशियात 11 एप्रिलपासून सुरू होणार होती. आता ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे.

फ्रान्सिस्को हा प्रतिभावान प्रशिक्षक होता. आमच्यासाठी हा मोठा धक्काच आहे. रविवारी सायंकाळी 7 वाजता मला हॉस्पिटलमधूल सांगण्यात आले की फ्रान्सिस्कोची प्रकृती सुधारत आहे, पण तासाभरात त्याच्या जाण्याची बातमी कळली. -पेपे ब्युएनो, क्लब अध्यक्ष

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply