महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंभावे येथील एका नऊ वर्षीय मुलावर तेथेच राहत असलेल्या तरुणाने बुधवारी (दि. 17) लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत महाड तालुका पोलीस ठाण्यात सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळी गोरेगाव येथील येथील एक महिला आपल्या मुलांसह आपल्या माहेरी आली होती. या महिलेची अल्पवयीन मुले बुधवारी घराबाहेर खेळत असताना शेजारीच राहत असलेल्या अमीर अली नेकवारे (वय 32) याने यातील नऊ वर्षीय मुलाला त्याच्या घरात बोलावून घेतले आणि या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला.
पीडित मुलाच्या आईने केलेल्या तक्रारीवरून महाड तालुका पोलीस ठाण्यात अमीर अली नेकवारे याच्याविरोधात भादवी कलम 377, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम 2012, 4,5, (एम) 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एन. एम. कुचेकर करीत आहेत.