Breaking News

‘फुलराणी’चा देशवासीयांना संदेश

हैदराबाद : वृत्तसंस्था

करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रुग्णालयातील इतर सहकार्‍यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास 78 हजार लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. यादरम्यान भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने आपल्या चाहत्यांना खास संदेश दिला आहे.

‘अत्यंत सावधनता बाळगा आणि घरातच राहा. पुढच्या दोन आठवड्यांचा कालावधी हा भारतासाठी अत्यंत नाजूक आणि कसोटीचा असणार आहे. इतर देशांनी कोरोनाबाबत काय सावधनता बाळगली आणि कशा प्रकारे कोरोनाचा सामना केला ते नीट समजून घ्या आणि त्यानुसार स्वत:च्या परिसरात सावधनता बाळगा’, असा संदेश सायना नेहवालने दिला. याआधी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीयांना खास संदेश दिला आहे. रोहितनेही चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘सध्याचे दिवस सर्वांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहेत. जगभरात कोरोना व्हायरसने धूमाकूळ घातला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या आजुबाजूला काय चाललंय, यावर आपले बारीक लक्ष पाहिजे. जर कोणाला या रोगाची लक्षणे दिसल्यास त्याने त्वरीत नजीकच्या रुग्णालयाला कळवले पाहिजे, असा संदेश रोहितने व्हिडीओच्या माध्यमातून दिला, तर ‘कोरोना आजाराचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपययाोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सार्‍यांनी खंबीर आणि कणखर राहा असे सांगून कोरोनाविरुद्ध लढा देऊ या, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरद्वारे म्हटले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply