Breaking News

टी-20 विश्वचषक स्पर्धा वेळापत्रकानुसार होईल : सीए

सिडनी : वृत्तसंस्था

कोरोनामुळे जगभरातील जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल), पाकिस्तान सुपर लीग (पीएसल) यासारख्या टी-20 लीग स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला,  पण ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए)ने व्यक्त केला आहे.

पुरुषांचा टी-20 विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीची टीम इंडिया 24 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. भारतीय पुरुष संघाला या स्पर्धेत ब गटात स्थान देण्यात आले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देशांतर्गत होणारी शेफिल्ड शिल्ड स्पर्धा रद्द करून न्यू साऊथ वेल्स संघाला जेतेपद जाहीर केले, मात्र ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत परिस्थिती सुधारेल आणि स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीन रॉबर्ट म्हणाले की, 15 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार्‍या अंतिम सामन्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील आणि जगाला प्रेरणादायी संदेश देतील. येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात सर्व क्रीडा स्पर्धा सुरळीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. अशी परिस्थिती उद्भवेल असे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते, पण परिस्थिती लवकरच सुधारेल आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धा होईल.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply