Breaking News

नागरिकांनी सतर्क रहावे -विक्रांत पाटील

पनवेल : वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क रहावे, नागरिकांना कोरोनाची लागण होवू नये यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गासंबंधात खूप काही कानावर येत आहे. वेगवेगळे व्हिडीओ पहायला मिळत आहेत. काही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून लोकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. तरी नागरिकांनी कृपया अशा चुकीच्या माहिती न पसरविता वास्तव्य सांगावे, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, गर्दीच्या ठिकाणी घालवू नये, काही त्रास वाटत असल्यास तात्काळ नजिकच्या दवाखान्यात किंवा पनवेल महापालिकेच्या उपजिल्हा रुग्णालयात जावून तेथे वेगळा कक्ष करण्यात आला आहे त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेवून त्यांच्याकडून औषधोपचार करून घ्यावेत किंवा तुम्हाला काही मदत लागल्यास पायोनिअर विभागात असलेल्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन माजी उपमहापौर व नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply