Breaking News

महिला पोलिसांना कैद्याच्या नातेवाईकांकडून मारहाण; तळोजा मध्यवर्ती कारागृहातील घटना

पनवेल : वार्ताहर

तळोजा मध्यवर्ती कारागृहात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वरींदरकौर बलकारसिंग अठवाल या महिलेला अडविण्यात आल्यामुळे वरींदरकौर हिने तळोजा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या तीन महिला शिपायांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महिला पोलीस शिपायांनी दिलेल्या तक्रारीवरुन खारघर पोलिसांनी वरींदरकौर हिच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील आरोपी महिला वरींदरकौर हिचा नातेवाईक जोरावरसिंग हा तळोजा कारागृहात बंदिस्त असुन जोरावरसिंग याच्या संदर्भात तळोजा कारागृहातील अधिक्षकांना भेटण्यासाठी ती तळोजा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेली होती. या वेळी वरींदरकौर हिने साहेबांना भेटायचे असल्याचे सांगितल्याने प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या महिला कारागृह शिपाई रजनी वनवे यांनी हवालदार कुंभार यांना याबाबत माहिती दिली. मात्र कारागृह अधिक्षकांना पुर्वपरवानगीशिवाय भेटता येत नसल्याने कुंभार, वरींदरकौर हिला समाजावुन गेटमध्ये आले. या वेळी कारागृहातुन बाहेर जाण्यासाठी पेन्शनधारकाचे नातेवाईक गेटबाहेर जात असताना वरींदरकौर हिने कारागृहाचा छोटा लोखंडी दरवाजा जोरात ढकलून तीने विनापरवानगी जबरदस्तीने आतमध्ये प्रवेश केला. दरवाजा ढकलल्यामुळे त्याठिकाणी तैनात असलेल्या महिला शिपाई वनवे यांच्या डोक्याला लागुन त्या खाली पडल्या. त्यानंतर देखील त्यांनी वरींदरकौर हिला आत जाण्यापासून रोखले. त्यामुळे वरींदरकौर हिने वनवे यांची कॉलर पकडून त्यांना धक्का दिला. तसेच त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वनवे यांच्या मदतीला इतर दोन महिला कारागृह शिपाई आल्या असताना, वरींदरकौर हिने त्यांचे कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करुन त्यांना मारहाण केली. त्यानंतर देखील या तीन्ही महिला कारागृह शिपायांनी वरींदरकौर हिला बाहेर काढले. या झटापटीत तीन्ही महिला कारागृह शिपायांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply