Breaking News

खोपोलीत कचर्‍यात आढळल्या दोन हजारांच्या बनावट नोटा

खालापूर : प्रतिनिधी
खोपोलीत विणानागर परिसरात सोमवारी (दि. 25) सकाळी रस्त्यावर पडलेल्या कचर्‍याच्या पिशवीत दोन हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. पोलिसांनी पाचारण केल्यावर हा खुलासा झाला.
खोपोली शहरातील विणानगर परिसरात मॉर्निंग वॉकला जाताना व्हीडीएम स्कूलच्या जवळ कचर्‍याच्या पिशवीत दोन हजारांच्या नोटा नागरिकांना दिसल्या. ही बाब खोपोली पोलिसांच्या लक्षात आणून देताच ठाणे अंमलदार शीद व सहकार्‍यांनी धाव घेतली. पोलिसांनी या नोटांची प्रत्यक्ष तपासणी केली असता, त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply