Breaking News

पनवेलमध्ये दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. त्याअंतर्गत पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महापालिका क्षेत्र आणि तालुका भागातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांगत्वाचे वैद्यकिय प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष शिबिराचे आयोजन मंगळवारी (दि. 28) करण्यात आले होते. हे शिबिर महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले. या शिबिरात जवळपास 300 हून अधिक दिव्यागांनी सहभाग घेतला होता.

पनवेल तालुक्यातील दिव्यागांना प्रमाणपत्रासाठी अलिबागला जावे लागत होते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन दिव्यांगांना पनवेलमध्येच या शिबिराच्या माध्यमातून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. यापुढेही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून दिव्यांगांचे कष्ट कमी होतील. असे या वेळी सांगण्यात आले. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, भिषक असे विविध तज्ज्ञ सहभागी झाले होते. या शिबिरात जवळपास 300 दिव्यागांनी सहभाग घेतला. या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र निःशुल्क देण्यात आले.

या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका मोनिका महानवर, आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, वैद्यकिय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय डॉ. सचिन सपकाळ उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचा समाज कल्याण विभाग, डॉ. सुरेश पंडित, तसेच वैद्यकिय आरोग्य विभागातील कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply