
खारघर : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूपासून होणारा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना सॅनिटायझर व मास्कची आवश्यकता आहे व बाजारात या मास्कचा तुटवडा असून जे आहेत ते चढ्या भावाने विकले जात आहेत. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने खारघर-तळोजा मंडल उद्योग आघाडीच्या वतीने खारघर रेल्वेस्टेशनच्या प्रवाशांना 300 मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. उपस्थितांची कोरोनासंदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी उद्योग सेलचे संयोजक राजेंद्र मामा मांजरेकर, मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, सोशल मीडिया सेलचे संयोजक अजय माळी, मोना अडवाणी, ईश फाऊंडेशनच्या कीर्ती मेहरा व भाजप कार्यकर्ते संदीप रेड्डी, विजय उजाळंबे, संदीप कासार उपस्थित होते.