उरण : वार्ताहर
कोरोना विषाणूचा विळखा राज्यभरात वेगाने पसरत आहे. तो आटोक्यात यावा त्यासाठी उरण व्यापारी असोशिएशनने शुक्रवारी (दि. 20) उरण बंदचे अवाहन केले होते. उरण व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष व उरणचे आमदार महेश बालदी, उपाध्यक्ष कौशिक शाह, सेक्रेटरी हस्तीमल मेहता व सदस्य यांनी उरण बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उरण बाजार पेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली. या बंदमध्ये जीवनावश्यक वस्तू (किराणा, दुध, मेडिकल, भाजीपाला) वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सर्व व्यापार्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे उरण व्यापारी असोशिएशन उपाध्यक्ष कौशिक शाह यांनी केले आहे.