Breaking News

दादा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सल्लागार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

 इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा 12वा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघे 9 दिवस शिल्लक राहिले आहेत. गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने हंगामाची सुरुवात होईल. यंदाही चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, यावेळी दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेव्हिल्स) संघाने नव्याने संघबांधणी केली असून ते मातब्बरांना धक्का देण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या या निर्धाराला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे पाठबळ मिळणार आहे. गांगुलीची दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.

 भारताचा हा दादा खेळाडू आयपीएलच्या आगामी हंगामात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगसह दिल्लीला मार्गदर्शन करणार आहे. पॉटिंग दिल्लीचा प्रशिक्षक आहे.  दिल्ली कॅपिटल्ससह काम करण्यास उत्सुक आहे. जिंदाल आणि गडथ समुहाला अनेक वर्षांपासून मी ओळखतो. त्यामुळे त्यांच्या संघासोबत काम करताना आनंद मिळेल, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.

2018 च्या हंगामात दिल्लीला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. पण यंदा नवीन नावासह मैद उतरणारा दिल्लीचा संघाने जेतेपद पटकावण्यासाठी कंबर कसली आहे.  

श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या दिल्ली संघाला पहिल्याच सामन्यात माजी विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 26 मार्चला हा सामना होणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर ते गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सशी भिडतील.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply