Breaking News

कोरोना विषाणूची काळजी नको… सावध राहा!

लहान-लहान थेंबाद्वारे विषाणू पसरतात.श्वसनासंबंधी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करुन आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना सर्दी, फ्लू आणि उजतखऊ-19 यासारख्या  विषाणूंपासून वाचवतो.

जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या-

जर आपल्या अस्वस्थत वाटत असल्यास घरी राहा. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय मदत घ्या आणि पूर्वसूचना म्हणून डॉक्टरांना संपर्क करा. या काळात आपल्या स्थानिक आरोग्य अधिकार्यांच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करा.

का करावे?

कारण आपल्या भागातील परिस्थितीविषयी स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांकडे अद्यावत माहिती असते. पूर्वसूचना म्हणून संपर्क केल्यास आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रांमध्ये त्वरित आपल्याला योग्य आरोग्य सुविधा मिळवून देता येईल. यामुळे आपले संरक्षण देखील होईल आणि जीवघेणे विषाणू आणि इतर संसर्गाचा फैलाव रोखण्यास मदत होईल.

हे करू नका

सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे.

तुम्हाला ताप व खोकला यासारखी लक्षणे असताना इतरांशी निकटचा संपर्क ठेवणे.

प्राण्यांशी थेट संपर्क तसेच कच्चे, अर्धवट शिजलेले अन्न खाणे.

कत्तलखाने व उघड्यावर मांस असणार्‍या ठिकाणी जाणे.

आरोग्य शिक्षण व संवाद

राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनता, वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे.

करोना विषाणू.. काळजी करू नका.. सावध राहा! स्वतःच्या आणि इतरांच्या आजारी पडण्यापासून संरक्षण करा..

आपले हात स्वच्छ धुवा, खोकल्यावर अथवा शिकल्यानंतर, एखाद्या आजारी व्यक्तीची काळजी घेताना, स्वयंपाक करण्यापूर्वी, तयार करताना आणि तयार केल्यानंतर. जेवणापूर्वी, शौचानंतर, प्राण्यांचा सांभाळ केल्यानंतर आणि प्राण्यांची विष्ठा काढल्यानंतर.

अधिक माहितीसाठी आपल्याजवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा. राष्ट्रीय कॉलसेंटर क्रमांक- +91-11-23978046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक-020-26127394, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक- 104. प्रवास करताना काळजी घ्या. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर थुंकणे टाळा. पूर्णपणे शिजवलेले अन्न खावे. आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांबरोबर थेट संपर्क आणि प्रवास करणे टाळा.

हे करा

स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा. शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा. सर्दी किंवा फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजिकचा संपर्क टाळा. मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून, उकडून घ्या.

जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा.

करोना नियंत्रण कक्ष

सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक 104 करोना विषाणू विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय संचालक, आरोग्य सेवा, पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून येथील संपर्क क्रमांक 020-26127394 असून तो सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधीत कार्यरत आहे. नवीन करोना  विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

(समाप्त)

-मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, रायगड अलिबाग.

(साभार- सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांची माहिती पुस्तिका)

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply