बाहेरील नागरिकांना गावात प्रवेशबंदी; तरुणांसह ग्रामस्थ सरसावले
पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्चपर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व जण आपापली काळजी घेत आहेत. नेरेपाडा गावातील नागरिक देखील यात मागे नाहीत. नेरेपाडा गावात बाहेरून कोणीही व्यक्ती किंवा गावातील नागरिकांचे नातेवाईक येऊ नये यासाठी तरुणांनी एकत्र येऊन गावात येणाजाणारा रस्ता बंद केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे.
रस्ता बंद करताना किरण शेळके, समीर रोडपालकर, प्रविण म्हात्रे, आर्यन रोडपालकर, सौरभ रोडपालकर, नितेश पाटील, आकाश रोडपालकर, सारंग खुटले, विवेक भगत, नचिकेत रोडपालकर, रोशन रोडपालकर, कुणाल रोडपालकर, विश्वास म्हात्रे, विशाल शेळके, सतीश म्हात्रे, संदीप रोडपालकर, गुरुनाथ पाटील, रोशन म्हात्रे, सुरज रोडपालकर, भूषण रोडपालकर,
रोहित म्हात्रे, मयुर तांबडे, अविनाश रोड पालकर आदींनी मेहनत घेतली. गावात कोणी बाहेरील व्यक्ती येऊ नये यासाठी नेरेपाडा गावचे स्टॉप जवळच बंदी केलेली आहे.
हा रस्ता बंद करण्यासाठी आम्ही काही तरुण एकत्र आलो होतो. एक ते चार तरुण एकत्र येऊन रस्ता बंद करणे शक्य नव्हते. आम्ही जास्त तरुण एकत्र आलेलो असल्याने याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
– गावातील तरुण

पनवेल : प्रतिनिधी : शिरढोण ग्रामस्थांनी कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी गावातील तरुणांनी गावाच्या प्रवेशद्वारावर चोवीस तास पहारा ठेवला असून बाहेरच्या नागरिकाला प्रवेश बंद केला आहे. एकप्रकारे गावकर्यांनी स्वयंस्फूर्तीचा कर्फ्यू गावात लावला आहे
जगाला हादरवून सोडणारा कोरोनाचे राज्यात 106 रुग्ण सापडले. मुंबईत चार जणांचा मृत्यू झाला. पनवेल तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिरढोणची ओळख क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे गाव म्हणून आहे. येथील गावकार्यांनी कोरोनाचे संकट आपल्या गावाच्या वेशीवर आले असल्याचे पाहून त्याच्याशी सामना करून त्याला आपल्या गावात प्रवेश द्यायचा नाही असा निश्चय केला आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामस्थांनी आपल्या गावात कोरोना येऊ नये यासाठी गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला.
येथील तरुणांनी 22 मार्चपासून गावाच्या प्रवेशद्वारावर रात्रंदिवस पहारा द्यायला सुरुवात केली आहे. गावात फेरीवाल्यांना प्रवेश दिला जात नाही. बाहेरून गावात येणार्या आणि गावातून बाहेर जाणार्या व्यक्तीची चौकशी केली जाते. बाहेरून गावात येणार्यांच्या हातावर सॅयनिटायझरचे थेंब टाकूनच त्याला गावात प्रवेश दिला जात असल्याची माहिती भूषण म्हात्रे आणि मंगेश वाकडीकर यांनी दिली. या गावाचा आदर्श घेऊन आता तालुक्यातील इतर अनेक गावांनी हा प्रयोग राबविण्यास सुरुवात केल्याचे समजते.