पनवेल : रामप्रहर वृत्त
रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 23 ते 28 मार्चदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत रक्तदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रक्तदान शिबिराचे आयोजित करणे शक्य नसल्याने कॅन्सर पीडित रुग्णांना लागणार्या रक्तपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केलेले असताना रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली नोंद करावी. त्यांना योग्य वेळ ठरवून टाटा कॅन्सर रुग्णालयातील अद्ययावत रक्तपेढीत गटागटाने रक्तदान करण्यास नेण्यात येईल, असे आवाहन भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …