कर्जत : प्रतिनिधी : हल्लीच्या युगात नुसती पदवी घेऊन फायदा नाही. पदवीनंतर विविध क्षेत्राचा सखोल अभ्यास करून निवडलेल्या क्षेत्राचे शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन सनवेज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक नितीन पाटील यांनी कर्जत येथे केले.
कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या कर्जत येथील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच सेमिनार हॉलमध्ये झाला. त्यावेळी नितीन पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या उपक्रमांचा आढावा सादर केला.
पदवीचा उपयोग केवळ आपले मेडिकल दुकान किंवा नोकरी करण्यासाठी करू नका. तर चांगले उद्योजक बनून तुमच्या कंपनीत रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करून समजोपयोगी काम करा, असा सल्ला संचालक महेशकुमार होंगल यांनी दिला. या वेळी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. वृषाली जांभूळकर यांनी केले. अध्यक्षा अनुपमा धारकर-वांगडी, उपाध्यक्ष कॅप्टन सारिपुता वांगडी, विजय मांडे, प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे, प्रा. किरण चौधरी, प्रा. गिरीश दाखवे, प्रा. प्रसाद पुळेकर, प्रा. जितेंद्र पाटील, प्रा. गणेश दारवणकर, प्रा. संदीप वाघुलदे, प्रा. निलेश गोर्डे आदी या वेळी उपस्थित होते.