Breaking News

पासपोर्ट कार्यालय सुुरू झाल्याने नागरिकांना दिलासा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या
इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. गेली अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती.
शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक प्रक्रियेकरिता ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. यामध्ये त्यांचा वेळही जात होता, शिवाय प्रवासभाड्यात खिशाला झळही बसायची. यामुळे नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती.
अनेक वर्षांपासून जागेअभावी ही मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती. मागील दीड वर्षापासून पासपोर्ट विभागाकडून कार्यालयासाठी स्वतंत्र जागेचा शोध सुरू होता. अखेर वाशीतील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यानुसार रविवारी त्या ठिकाणच्या नव्या पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, नगरसेवक नामदेव भगत आदींसह पासपोर्ट कार्यालयाचे अधीक्षक अजयकुमार सिंग, अधिकारी
विजयकुमार नायर उपस्थित होते. वाशीतील या पासपोर्ट कार्यालयाचा लाभ नवी मुंबईसह पनवेल परिसरातील नागरिकांना होणार आहे. सद्यस्थितीला नवी मुंबईसह पनवेलकरांना पासपोर्ट संबंधीच्या कामासाठी ठाणे अथवा मुंबईला जावे लागत आहे. यामध्ये नागरिकांचा कार्यालयीन प्रक्रियेपेक्षा सर्वाधिक वेळ प्रवासातच जात होता. लहान मुलांसह वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होताना दिसून येत होता. यामुळे वाशीत नवे पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने ऐरोली ते पनवेलपर्यंतच्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply