मुंबई : येथील सैफी रुग्णालयातील सिनियर कन्सल्टंट डॉक्टर अबिदन बहरीनवाला यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. डॉ. बहरीनवाला यांच्या घरी सात दिवसांपूर्वी अमेरिकेतून परिचित आले होते. त्यांनी त्यांची लक्षणे
लपविली. त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला होता, मात्र त्यांनी तो पाळला नव्हता. त्यांच्यापासून डॉ. बहरीनवाला यांना कोरोनाची लागण झाली, तर त्यांच्यामुळे सैफी रुग्णालयातील त्यांचे चिरंजीव कार्डियाक सर्जन डॉ. हाफिज बहरीनवाला आणि घरातील अन्य चौघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. डॉ. अबिदन बहरीनवाला यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील सर्वांना क्वारंटाईन केले गेले आहे. त्यांची संख्या 15 ते 16 असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …