Breaking News

गरीबांना मदतीसाठी क्रिकेटपटू सरसावले

पुण्यातील रोजंदारी कामगारांना धोनीकडून अर्थसहाय्य

पुणे : प्रतिनिधी
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुण्यातील रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. लॉकडाऊन काळात रोजंदारी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी मुकूल माधव फाऊंडेशन ही संस्था निधी गोळा करीत आहे, त्यांच्या या उपक्रमाला धोनीने एक लाख रुपयांची मदत केली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि पुण्यातील संख्याही अधिक आहे. त्यामुळे अन्य शहरांप्रमाणे हेही शहर पूर्णपणे लॉकडाऊन केले गेले आहे. धोनीने केलेल्या मदतीतून रोजंदारी कामगारांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. मुकूल माधव फाऊंडेशनने पुणे शहरातील काही रोजंदारी कामगारांना शोधलं आहे आणि त्यांना ही मदत केली जाणार आहे. साबण, कडधान्य, तांदुळ, पीठ, तेल, पोहे, बिस्किट इत्यादी वस्तू या कुटुंबीयांना देण्यात येतील.  
धोनीची पत्नी साक्षीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ही माहिती शेअर केली आणि इतरांनाही देणगी देण्याचे आवाहन केले आहे. धोनीच्या आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान व युसूफ पठाण यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे. गांगुलीने गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दिले, तर पठाण बंधुंनी मास्क वाटप केले. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही पंतप्रधान मदत निधीत आपले योगदान केले आहे. 

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply