Breaking News

गर्दीमुळे रोह्यातील भाजी मार्केट बंद

शहरातील चौकात अंतर ठेवून होणार भाजीविक्री

रोहा : प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात व राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, मेडिकल, भाजीपाल्यासह अन्य वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत, परंतु रोह्यात अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रोह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटमधील वाढती गर्दी पाहता रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने रोह्यातील भाजी मार्केट शनिवारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा नगर परिषद टीमने भाजी मार्केट खाली करण्याचे काम सकाळपासून सुरू केले होते. या वेळी भाजीविक्रेत्यांनी आपले साहित्य, तंबू जमा करण्यास सुरुवात करून संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला. रोहेकरांना लागणारा भाजीपाला आता रोहा शहरातील काही भागातील चौकांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ठरावीक अंतर सोडून हे भाजीविक्रते बसणार असून या ठिकाणी गर्दी होणार नाही याची भाजी विक्रेत्यांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. या वेळी सभापती अहमद दर्जी, नगरसेवक महेंद्र गुजर, महेश कोलाटकर, नगर परिषद अधिकारी निवास पाटील आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन सुरू असतानाही रोहा शहरातील भाजी मार्केटमध्ये मोठी गर्दी होऊ लागल्याने हे भाजी मार्केट बंद करीत आहोत. नागरिकांना भाजीची व्यवस्था व्हावी यासाठी रोहा शहरातील काही चौकांत भाजीविक्री होणार आहे. त्या त्या भागातील लोक त्या ठिकाणी भाजी खरेदी करतील. पर्यायाने शहरात गर्दी होणार नाही.

-बाळासाहेब चव्हाण, मुख्याधिकारी

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply