Breaking News

नवीन पनवेलमध्ये उद्यान नूतनीकरण, सुशोभीकरण

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिका क्षेत्रात विकासाची अनेक कामे होत आहेत. त्यानुसार नवीन पनवेल सेक्टर 3 आणि 4 मध्ये उद्यान नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. 3) महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग 16 नवीन पनवेलमधील प्लॉट नंबर 56 व 57, सेक्टर 4 प्लॉट नंबर 229 येथील उद्यानांचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
या भूमिपूजन कार्यक्रमास उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर,  नगरसेविका राजश्री वावेकर तसचे किशोर चौतमोल, महेंद्र वावेकर, मयूर आंग्रे, अक्षय सिंग, राहुल शिंदे, यमुना प्रकाशन, विठाबाई सावंत, संतोष बेन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply