Breaking News

उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः बातमीदार

जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उलवे, विचुंबे, पालीदेवद (सुकापूर) परिसर

कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. उलवे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या सेक्टर 8, उलवे येथील डेल्टा टॉवर, (ए विंग) ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना

विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. उलवे येथील प्लॉट 197, सेक्टर 3, कृष्ण कुंज इमारत येथेही एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळल्याने या हद्दीतील परिसरही कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेली साई निल दर्शन को. ऑ. हौ.सो., विचुंबे, ता. पनवेल ही संपूर्ण इमारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

तसेच जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे पालीदेवद (सुकापूर) येथेही एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या मौजे पालीदेवद (सुकापूर) येथील साक्षी पार्क-2, बिल्डिंग नं. 5 ही इमारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. 

या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply