Breaking News

रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कर्जत ः बातमीदार

राज्य सरकारच्या आवाहनानुसार नेरळ येथील मुस्लिम आणि बोहरी समाज यांच्या माध्यमातून नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी 61 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य करून रक्तदान शिबिर यशस्वी केले.

नेरळच्या सम्राटनगर भागातील बोहरी मशीद परिसरात नेरळ मुस्लिम-बोहरी समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेरळचे माजी सरपंच आयुब तांबोळी, जयेद नजे, तहेसिन सहेद, माजी सरपंच आवेश जुवारी, राजेश गायकवाड, आबा पवार, दिनेश सदावर्ते, सलीम तांबोळी, नोमान नजे आदी उपस्थित होते.

मुंबईतील रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढीने रक्त संक्रमणाचे काम केले. रेडक्रॉस सोसायटीचे सुशीलकुमार हेवाले, डॉ. प्रमोद वाझरेकर, सहाय्यक रणजित निकम, त्रिवेणी खट्टण, विद्या महाबळे, हेमंत वाडकर, रवींद्र साळुंखे, नितीन चव्हाण यांनी रक्त संक्रमणाचे काम केले. सोशल डिस्टन्स लक्षात घेऊन रक्तदात्यांना दोन मीटर लांब ठेवून रक्तदान केले जात होते. शिबिर यशस्वितेसाठी तौसीफ मुल्ला, हनिफ शेख, अलकाश मुल्ला, अबीद सहेद, जयेद शेख आदींनी प्रयत्न केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply