Breaking News

देशात 24 तासांमध्ये आढळले 227 कोरोनाग्रस्त

नवी दिल्ली, मुंबई : गेल्या 24 तासांत देशातील 227 कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकरणे समोर आली आहेत. देशात मंगळवारी (दि. 31) दुपारी 4 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1251वर पोहोचली होती. यापैकी 101 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एक रुग्ण स्थलांतरील आहे. सध्या 1117 रुग्णांवर उपचार सुरू असून ते वैद्यकीय तपासणीखाली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार आतापर्यंत देशात कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मंगळवारी आढळलेल्या रुग्णांचा एकूण आकडा 77 झाला आहे. दिवसभरात एकट्या मुंबईत 59 कोरोनाग्रस्त आढळले. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या एकूण संख्येने तीनशेचा टप्पा पार केला आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply