
पनवेल : वार्ताहर
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व विरेद्र यशवंत म्हात्रे यांच्या माध्यमातून भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाण्याचे वाटप नेरुळ रेल्वेस्थानक व नेरुळ जिमखानाजवळ सेक्टर-28 येथे करण्यात आले. जागतिक आणीबाणीच्या काळात कोरोनासारख्या महामारीला सामोरे जाताना आपण सगळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतच आहोत. परंतु या समाजात कित्येक कुटुंबे आणि माणसे अशी आहेत ज्यांना आधार नाही. अशाच लोकांना या कठीण परीस्थितीत आम्ही लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या माध्यमातून पोषक आहाराची सोय करून दिली व यापुढेही ते अशा प्रकारची सेवा करीत राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.