Breaking News

जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तहसील कार्यालयास सुपूर्द

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन व संचारबंदीमुळे गरीब, गरजूंना मदत व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांचाकडून जीवनावश्यक वस्तूंचे दोन हजार पॅकेट पनवेल तहसील कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने 500 पॅकेट शनिवारी (दि. 4) तहसील कार्यालयास सुपूर्द करण्यात आले.
या पॅकेटमध्ये तांदूळ, डाळ, मसाला, मीठ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. कोरोनामुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत पनवेल परिसरातील गोरगरीब लोक उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी गरीब, गरजूंना मदतकार्य सुरू केले. पनवेल परिसरातील अनेक विभागात गोरगरीबांना ही मदत पोहोचवली जात आहे. त्याच अनुषंगाने तहसील कार्यातून होणार्‍या मदतकार्यात हातभार लागावा, यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट देण्यात येत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply