नागोठणे ः प्रतिनिधी – नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आणि कर्मचारी तसेच नागोठणे ज्वेलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोलमजुरी करणार्या 10 गरीब कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनामुळे सर्व रोजगार ठप्प झाला असून कामधंदा उपलब्ध नसल्यामुळे या मजुरांची उपासमार होत आहे. ही परिस्थिती निदर्शनास आल्याने पोलीस ठाणे आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्पष्ट केले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …