Breaking News

आदित्य बिर्ला कंपनीकडून तहसील कार्यालय उपक्रमात सहभाग

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु असून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन परिस्थिती आहे. देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्नही सुरु आहेत. परंतू लॉकडाऊन परिस्थिती असल्याने रोजंदारीवर काम करणार्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. खालापुर तालुक्यातील गरजू गोरगरिबांचे कुटुंब सावरता यावे, यासाठी तहसिल कार्यालयाच्या वतीने शिधा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मोहीम सुरू असून यासाठी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील आदित्य बिर्ला कंपनीकडून  सीएसआर फंडातून खालापूर तहसील कार्यालयाच्या उपक्रमात सहभागी होवून दोन लाख किमतीचा तांदूळ, डाल, कांदा, बटाटा, लसूण, खाद्यतेल, लोणंच, पापड, गोडा मसाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू मदत केली आहे. कोरोना पाश्वभुमीवर आदित्य बिर्ला ग्रुपने कोरोना आजारांवर पाचशे करोड तर पंतप्रधान केअर फंडमध्ये चारशे करोड मदत केली आहे. यातच पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील आदित्य बिर्ला कार्बन कंपनीकडून खालापूर तहसील कार्यालयाच्या उपक्रमात हातभार लावून गोरगरिब गरजूंना जीवनावश्यक वस्तू मदत केली आहे. लॉकडाऊन कालात खालापूर तहसील कार्यालयाकडून हातावर काम करुन रोजंदारी करणार्‍या समाजातील गरजूंना संकटसमयी आधार देण्याचे कार्य सुरू आहे. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील आदित्य बिर्ला कंपनीकडून तहसील उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसून येते.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply