Breaking News

कोविड 19 विरोधात दीपक फर्टीलाझयरचे योगदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असताना दीपक फर्टिलायझरने तळोजा प्रकल्पात कामावर बोलवून कर्मचार्‍यांचे आयुष्य धोक्यात टाकले आहे, या बातमीच्या संदर्भात ही माहिती दिली जाते आहे. यासंदर्भातील गैर समज दूर करण्यासाठी काही मुद्द्यांवर दीपक फर्टिलायझर व्यवस्थापनाने लक्ष वेधले आहे. दीपक फर्टीलाझयर आयसो प्रोपिल अल्कोहोलची (आयपीए) निर्मिती करते, हा अत्यावश्यक पदार्थ असून सॅनिटायझर आणि जंतूनाशकांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. सरकारने आम्हाला हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी परवानगी तर दिली आहेच पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे याचे उत्पादन करून देशाच्या कोविड 19 विरोधातील लढाईमध्ये आम्ही महत्त्वाचे योगदान देतो आहोत कारण आयपीएचे उत्पादन करणारे आम्ही देशातील एकमेव उत्पादक आहोत. आमची सर्व उत्पादने अत्यावश्यक पदार्थांमध्ये येतात आणि त्यासाठी आवश्यक सर्व परवानगी आमच्याकडे आहेत. देशातील खाद्य सुरक्षेची गरज पूर्ण करण्यासाठी आमची खते मदत करत आहेत. आमचे टेक्निकल अमोनियम नायट्रेट (टीएएन) देशातील कोळसा क्षेत्राला मदत करते जे वीज निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply